रशियाचा वरिष्ठ अधिकारी स्फोटात ठार   

मॉस्को : मोटारीत झालेल्या बॉम्बस्फोटात रशियाच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याचा मृत्यू झाला. रशियन सशस्त्र दलातील लेफ्टनंट जनरल यारोस्लाव मोस्कालिक हे बॉम्बस्फोटात ठार झाले. यारोस्लाव यांच्या मोटारीत स्फोटके ठेवण्यात आली होती. मॉस्कोबाहेरील बालशिखा परिसरात त्यांच्या मोटारीत स्फोट होऊन त्याचा मृत्यू झाला. स्फोटामुळे मोटार उंच उडाली. स्फोटात आयईडीचा वापर झाल्याचे पुरावे घटनास्थळी मिळाले आहेत.

Related Articles